SAKET PRAKASHAN PVT LTD
Anolkhi Disha - Narayan Dharap
Anolkhi Disha - Narayan Dharap
11% OFF
Sale price Rs. 290.00
Couldn't load pickup availability
Author: Narayan Dharap
Brand: SAKET PRAKASHAN PVT LTD
Edition: Second
Features:
- Anolkhi disha- bhag 1 - marathi
- Language: marathi
- Binding: paperback
- Package contents: anolkhi disha- bhag 1 - marathi ... Read More
Author: Narayan Dharap
Brand: SAKET PRAKASHAN PVT LTD
Edition: Second
Features:
- Anolkhi disha- bhag 1 - marathi
- Language: marathi
- Binding: paperback
- Package contents: anolkhi disha- bhag 1 - marathi
Binding: Paperback
Number Of Pages: 288
Release Date: 01-01-2019
Part Number: 9352202082
Details: Product Description
गेल्या सहा दशकांहून अधिक काळ सातत्याने भयकथा लिहून वाचकांना विस्मयचकित करणारे नारायण धारप यांचे ‘अनोळखी दिशा’ हे पुस्तक म्हणजे आजवर त्यांनी लिहिलेल्या निवडक भयकथांचा संग्रह आहे. नारायण धारप हे नाव आताच्या वाचन करणार्या पिढीला नवीन असलं, तरीही आपल्या रहस्यमय लेखकाने त्यांनी एक काळ गाजवला होता. गेल्या शतकातील साठच्या दशकात त्यांनी लेखनाला प्रारंभ केला आणि त्यानंतर अखेरपर्यंत ते सातत्याने लिहीत राहिले आहेत. दूरदर्शन आणि इतर प्रसारमाध्यमांची फारशी चलती नव्हती, त्या काळात सामान्य वाचक अतिशय आतुरतेने त्यांच्या लेखनाची वाट पाहत असत. नारायण धारपांच्या कथा ‘कथा’ या विकाराची अनेक रूपे घेऊन येतारत. कथानकात पुढे काय घडणार याची उत्सुकता कायम ठेवत वाचकाला आपल्या लेखनात गुंतवून ठेवणे, रहस्यमय व गूढ पद्धतीने भयाच्या तावडीत माणसे कशी सापडतात, शरीरिक व मानसिक वेदना कशी भोगतात, भूत-पिशाच्च, क्रुर पीडा देणार्या जीवनसृष्टीच्या काल्पनिक जगाचे अस्तित्व कसे जाणवते आणि दैवर शक्तीने, चमत्काराच्या कृपेने त्यातून ती कशी सुटतात याचे वर्णन अतिशय चित्तवेधक आहे. माणसाला नेहमीच कोणतेही रहस्य जाणून घेण्याच मुळातच उत्कंठा असते. जितके समाधान वाचनातून मिळते तितके दुसर्या कोणत्याही माध्यमातून मिळत नसल्यसामुळे वाचनाकडे असकर्षित झालेली नवी पिढी रहस्यमय व गूढ कथेच्या शोधात असते. वाचकांची ही भूक भागविण्याचे काम नारायण धारपांचे साहित्य करते. एकूणच मराठी साहित्यात रहस्य व गूढतेचे दालन समृद्ध करणार्या लेखकात नारायण धारपांचे स्थान वरचे आहे. धारपांच्या अद्भुत घटनांचे तर्कातीत मनोव्यापारांचे खेळ वर्णन करणार्या या कथा वाचकांना एका जागेवर खिळवून ठेवतात, हे वेगळे सांगायला नको.
Review
अज्ञात, अनाकलनीय आणि अतर्क्याचा गेली सहा दशके मागोवा घेणारी नारायण धारपांची कथा ही मराठीतील नि:संशय श्रेष्ठ भयकथा ठरते. धारपांच्या शब्दांना ओलसर, शेवाळी भयाचा बुळबुळीत स्पर्श आहे. प्रसंगवर्णनांना विंचवाच्या नांगीचा डंख आहे. सातत्याने भयकथेचा लोकप्रिय म्हणवला जाणारा कथाविष्कार हाताळणार्या धारपांची शब्दकळा तरीही सालंकृत आणि श्रीमंत आहे. हेच त्यांच्या कथांच्या चिरंतन लोकप्रियतेचे गमक मानायला हरकत नाही. कमीत कमी संवादांच्या वापरातून निव्वळ स्थलकाल वर्णनांद्वारे वाचकाचे काळीज गोठवणार्या, भरदिवसा वाचकाच्या मनामेंदूला भयाचा जहरी दंश करणार्या धारपांच्या अ-गोचर कथांनी मराठी वाचकाच्या मनात भयकथेचा अनभिषिक्त सम्राट हे अढळस्थान धारपांना निर्विवादपणे बहाल केले आहे. - हृषीकेश गुप्ते
About the Author
भयकथांचा अनभिषिक्त सम्राट: नारायण गोपाळ धारप जन्म : २७ ऑगस्ट १९२५ शिक्षण : रसायनशास्त्रात बी. एस्सी टेक (मुंबई विद्यापीठ) कार्यक्षेत्र : मराठी साहित्यिक साहित्य प्रकार : कादंबरी, रहस्यकथा, भयकथा, गुढकथा, विज्ञानकथा मृत्यू : १८ ऑगस्ट २००८ पुणे धारपांविषयी थोडेसे : व्यवसायाच्या निमित्ताने काही वर्षे अमेरिकेत राहिलेले नारायण धारप हे नंतर पुण्यात स्थायिक झाले. पुण्यात त्यांनी फर्निचरचा व्यवसाय सुरू केला आणि त्याचबरोबर लेखनासही सुरुवात केली. गुढकथा, भयकथा, रहस्यकथा, विज्ञानकथा हे विविध साहित्य प्रकार त्यांनी अतिशय समर्थपणे हाताळले. मराठी साहित्यात रहस्यमय, भयग्रस्त गुढकथांचे आणि कादंबऱ्यांचे दालन समृद्ध करणारे जे काही मोजकेच स्वतंत्र लेखन करणारे लेखक आहेत. त्यात नारायण धारपांचे नाव अव्वल आहे. त्यांनी लिहिलेले 'समर्थ' हे काल्पनिक पात्र आणि त्यावर आधारित गुढकथांनी एक काळ गाजवला. त्यांच्या 'अनोळखी दिशा' या गुढकथांवर आधारित पुस्तकावरून एक मालिका इ.स. २०११ मध्ये स्टारप्रवाह या मराठी वाहिनीवर प्रदर्शित झाली. त्याचबरोबर त्यांच्या एका कथेवर आधारित असलेली 'ग्रहण' ही मालिकाही खूप गाजली. त्यांच्या कथांपासून प्रेरणा घेऊन आनंद राय यांनी २०१८ मध्ये 'तुंबाड' या चित्रपटाची निर्मिती केली, ज्याचे लेखन आणि दिग्दर्शन राही बर्वे यांनी केले होते.
EAN: 9789352202089
Package Dimensions: 8.2 x 5.5 x 0.7 inches
Languages: Marathi
